पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत MSRTC चालवणार तब्बल 450 अतिरिक्त बस

उन्हाळा सुरू झाला की पुण्यात एक वेगळीच धावपळ दिसते…कोणीतरी बॅग पॅक करत असतो, तर कोणीतरी अजूनही “तिकीट मिळेल का?” याच विचारात असतो.

आणि याच वेळी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) पुणेकरांसाठी मोठा दिलासा देत एप्रिलच्या मध्यापासून जूनपर्यंत 450 अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

अचानक इतक्या बस का वाढवल्या?

अचानक 450 अतिरिक्त बस वाढवण्याचा मागे मात्र एकच कारण आहे, ते म्हणजे “गावाकडे जाण्याची ओढ!” पुण्यात नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी राहणारे हजारो लोक दरवर्षी उन्हाळी सुट्टीत आपल्या गावी परततात. आणि त्या काही दिवसांत बसस्थानकांवर अक्षरशः पाय ठेवायला जागा मिळत नाही, एवढी गर्दी असते.

यंदाही स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि पिंपरी-चिंचवड येथील बस डेपोमध्ये मोठी गर्दी अपेक्षित आहे.

📍 कोणत्या मार्गांवर मिळणार बस?

या अतिरिक्त बस केवळ काही शहरांसाठी नाहीत, तर राज्यभर पसरलेल्या महत्त्वाच्या मार्गांवर चालणार आहेत.
त्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी, धाराशिव आणि कोकणातील अनेक भागांचा समावेश आहे. म्हणजेच, तुमचा रूट या यादीत असेल, तर यंदा प्रवास थोडा सोपा होण्याची शक्यता आहे.

पण यंदा गर्दी थोडी वेगळी असू शकते…
साधारणपणे परीक्षा संपल्या की लगेच प्रवासाची लगबग सुरू होते.
पण यंदा काही शाळांचे सत्र 25 एप्रिलपर्यंत वाढल्यामुळे गर्दी थोडी उशिरा पर्यन्तंर असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ट्रेन फुल, प्रायव्हेट बस महाग… मग काय?

एप्रिल-मेमध्ये ट्रेनचे तिकीट मिळणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखंच आहे!
आणि प्रायव्हेट बसचे दरही या काळात वेगाने वाढतात. अशा वेळी MSRTC बस अनेकांसाठी परवडणारा आणि विश्वासार्ह पर्याय ठरतात, आणि म्हणूनच या अतिरिक्त बस खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत.

प्रवाशांसाठी काय फायदा?

MSRTC च्या या निर्णयामुळे जास्त प्रवाशांना जागा मिळेल, शेवटच्या क्षणीही प्रवास शक्य होईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!